
Ram Krishna Hari meaning: आषाढी एकादशीला हिंदू धर्मात खुप महत्व आहे. यंदा आषाढी वारी १९ जूनपासून सुरु होणार आहे. या सोहळ्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. आषढी वारी ही महाराष्ट्रातील धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. लाखो वारकरी या वारीत सहभागी होतात. उन्हाच्या झळा असो किंवा पावसाच्या धारा वारकरी मंत्रमुग्ध होऊन पालखीचा आनंद घेत असतात. प्रत्येक वारकरी 'राम कृष्ण हरी' जप करत असतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की हाच मंत्र का जपतात? याचा अर्थ काय आहे? चला तर मग आज या मंत्राचा अर्थ आणि महत्व जाणून घेऊया.