

Narak Chaturdashi Karit Fruit Tradition
sakal
Narak Chaturdashi Tradition: दिवाळी म्हणजे संपूर्ण भारतात साजरा होणारा सर्वात मोठा सण. भारताच्या प्रत्येक भागात दिवाळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. प्रत्येकाच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या असतात. दिवाळीत घरात गोडधोड पदार्थांची - फराळाची रेलचेल असते, पण नरक चतुर्दशीला मात्र एक खास कडू फळ आवर्जून फोडलं जातं. ते म्हणजे कारिट! आकाराने अगदी छोटंसं असलेलं हे फळ पायाने चिरडण्याची परंपरा महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये आजही पाहायला मिळते. विशेषतः कोकणात या प्रथेला वेगळं महत्त्व आहे.