Chanakya Life Guide : नात्यात सुरुवातीला खूप प्रेम करणारे लोक, हळूहळू तुमच्यावर चिडचिड का करू लागतात? जाणून घ्या नेमकं कारण

Chanakya Niti on Hidden Human Nature in Relationships : नात्यातील सुरुवातीचा ‘गोडवा’ आणि नंतरची ‘चिडचिड’ या विषयावर चाणक्य नीती आणि आधुनिक मानसशास्त्रात काय सांगितले आहे आहे जाणून घ्या
Relationship Sweetness to Irritation Chanakya Niti Psychology

Relationship Sweetness to Irritation Chanakya Niti Psychology

esakal

Updated on

Human Psychology in Relationships : कोणत्याही नात्याची सुरुवात ही अत्यंत रंगतदार आणि स्वप्नवत असते. या काळात समोरची व्यक्ती आपल्यावर अमाप प्रेम करत असते, प्रत्येक गोष्टीत होकार देते आणि जगातील सर्वात उत्तम व्यक्ती असल्यासारखी वागते. आचार्य चाणक्य याविषयी सांगतात की, मनुष्य स्वभावाने अत्यंत चतुर आहे; जेव्हा त्याला एखादी गोष्ट किंवा व्यक्ती मिळवायची असते, तेव्हा तो स्वतःचे अवगुण लपवून फक्त सर्वोत्तम गुणच समोर मांडतो. यालाच आपण 'हनिमून फेज' म्हणतो.

या सुरुवातीच्या काळात मेंदूमध्ये ‘डोपामाइन’ नावाचे रसायन वेगाने स्रवत असते, ज्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या फक्त चांगल्या गोष्टीच दिसतात. परंतु, हा केवळ एक संमोहन काळ असतो, जिथे प्रत्येक जण स्वतःचा उत्कृष्ट मुखवटा घालून वावरत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com