
Rang Panchami significance: हिंदू धर्मात होळी सणाला खुप महत्व आहे. होळीनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी केली जाते. होलिका दहनाने सुरू होणारा रंगांचा हा सण रंगपंचमीला संपतो. रंगपंचमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार रंगपंचमीचा सण तामसिक गुण आणि राजसिक गुणांवर सत्वगुणाच्या विजयाचे प्रतीक आहे. यंदा रंगपंचमी कधी साजरी केली जाणार आहे आणि त्याचे महत्व काय आहे हे जाणून घेऊया.