

Why We Do Kanya Puja
sakal
KANYA PUJAN RITUALS AND TRADITIONS ON MAHA ASHTAMI: नवरात्रीचे नऊही दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. त्याचसोबत या दरम्यान अष्टमी आणि नवमीला बहुतांश घरात कन्या पूजन केलं जातं. या दिवशी लहान मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना जेवण दिले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, लहान मुलींमध्ये देवी दुर्गेचे रूप पाहिले जाते. त्यामुळे कन्या पूजनाच्या माध्यमातून देवीप्रती श्रद्धा व्यक्त केली जाते. पण कन्या पूजन करण्यामागे नेमकी कोणती मान्यता आहे? ही पूजा कशी केली जाते आणि या दिवशी मुलींना जेवण देण्यासोबतच भेटवस्तू का दिल्या जातात? जाणून घेऊया कन्या पूजनाचे महत्त्व आणि पूजेची पारंपरिक पद्धत.