

Jagannath Rath Yatra 2026: The Secret Behind Jagannath’s 15-Day illness!
esakal
Why Does Lord Jagannath Fall Sick Every Year?: जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असलेल्या ओडिशातील पुरी येथील भव्य रथयात्रेला आजपासून (आषाढ शुक्ल द्वितीया) सुरुवात झाली आहे. हिंदू पंचांगानुसार दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरी होणारी ही रथयात्रा एकूण १२ दिवस चालणार आहे. दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीयेला भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांची भव्य रथयात्रा निघते. पण तुम्हाला माहीत आहे का ? या जगप्रसिद्ध रथयात्रेच्या आधी भगवान जगन्नाथ तब्बल १५ दिवस खूप आजारी पडतात! या काळात मंदिराचे दरवाजे बंद होतात आणि देव पूर्णपणे गुप्तवासात जातात.