

Why Do Millions Walk to Pandharpur? Meaning of Wari and Who Are Warkaris Explained
eSakal
Pandharpur Wari history and significance: महाराष्ट्राची ओळख असलेली पंढरपूरची वारी ही वारकरी संप्रदायाची अत्यंत पवित्र आणि श्रद्धेने परिपूर्ण यात्रा आहे. ही ७०० हून अधिक वर्षांची अखंड भक्तीपरंपरा आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला आपल्या लाडक्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जातात. भगवान विठ्ठलाला भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांचं रूप मानलं जातं. ही वारी फक्त धार्मिक नसून भक्ती, श्रद्धा, समानता आणि एकतेचं प्रतीक मानली जातं. कोणताही जाती-भेद न करता प्रत्येक व्यक्ती या वारीत सामील होतात.