
श्रावणात शाकाहारी आहार पाळणे पवित्रता आणि आत्मशुद्धीला प्रोत्साहन देते.
शाकाहारी भोजन पचनसंस्था सुधारते आणि शरीराला हलके ठेवते.
शाकाहारी आहार पर्यावरण संरक्षणाला हातभार लावतो आणि टिकाऊपणा वाढवतो.
संपूर्ण वर्षभरात उपलब्ध नसतील एवढे खाद्यघटक या श्रावण महिन्याच्या काळात निसर्गात निर्माण होतात. शास्त्रानुसार ऋतुकालोद्भव आहाराचा आस्वाद घ्यावा असे सांगितलेले आहे. आपल्या शरीरातील बदलांचा परिणाम त्रासदायक होऊ नये, यासाठी निसर्ग तत्पर असतो. निसर्गात अचूकपणे त्या भाज्या उगवतात, फळे उपलब्ध होतात जे शरीराला हितकर असते. त्यांचाच वापर आपण परमेश्वराला अर्पण करण्यासाठी करतो आणि त्यापासून बनविलेल्या पदार्थाचा, या ऋतूतील श्रावणसरी अनुभवताना आपण त्यांचा आस्वादही घेतो.