

Diwali Padwa and Balipratipada History
sakal
वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज; अशी पाच दिवस दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या या प्रत्येकी पाच दिवसांना वेगवेगळं धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. त्यातच आज साजऱ्या होणाऱ्या बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्यालाही महत्त्व आहे. पण अनेकांच्या मनात प्रश्न असतो की, बलिप्रतिपदा आणि पाडवा हे दोन वेगवेगळे सण असूनही ते एकाच दिवशी का साजरे केले जातात? तसेच या दिवसाला एवढे महत्त्व का दिले जाते? चला, जाणून घेऊया यामागील धार्मिक परंपरा आणि पौराणिक कथा.