Yogini Ekadashi 2022: योगिनी एकादशीला करा हे काम, पापमुक्त व्हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yogini Ekadashi 2022:

Yogini Ekadashi 2022: योगिनी एकादशीला करा हे काम, पापमुक्त व्हाल

योगिनी एकादशीची तिथी भगवान श्री हरी विष्णूंना विशेष प्रिय आहे. त्यामुळे जे भक्त कोणत्याही एकादशीचे व्रत करतात, त्यांना विशेष फळ मिळते. योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार दान करणे उचित आहे. (yogini ekadashi know its story significance of this auspicious day)

हिंदू धर्मात एकादशी व्रताला महत्त्वाचे स्थान आहे. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. या एकादशीला “शायनी” एकादशी सुद्धा म्हणतात. एका वर्षात एकुण 24 एकादशी असतात. त्यापैकी आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला योगिनी एकादशी म्हणतात. आषाढ कृष्ण एकादशीचे नाव योगिनी असे आहे. या व्रताचे पालन केल्याने सर्व पापांचा नाश होतो. हे व्रत या जगात आनंद आणि परलोकात मुक्ति देणारं आहे अस सांगितले जातं.

हेही वाचा: आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 जून 2022

योगिनी एकादशी 2022 शुभ मुहूर्त, पारणाची वेळ

  • एकादशी तिथी प्रारंभ 23 जून रात्री 09:41 वाजेपासून एकादशी तिथी समाप्ती 24 जून रात्री 11:12 वाजतेपर्यंत

  • योगिनी एकादशी व्रत पारण वेळ : योगिनी एकादशी व्रताचे पारणे 25 जून रोजी सकाळी 05:41 वाजेपासून ते सकाळी 08:12 वार्जपर्यंत केले जाईल.

हेही वाचा: Ashadhi Wari : पुण्यनगरीच्या सेवेने सुखावले वारकरी

योगिनी एकादशी नेमके महत्व काय?

योगिनी एकादशीचे व्रत विश्वाचे पालनहार भगवान श्री विष्णूसाठी केले जाते. योगिनी एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि आयुष्यात सुख आणि समृद्धी प्राप्त होते. योगिनी एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने स्वर्गप्राप्ती होते. योगिनी एकादशी तिन्ही लोकांत प्रसिद्ध आहे. या एकादशीला केलेल्या उपवासाचे महत्त्व 88 हजार ब्राह्मणांना भोजन देण्याइतके महत्त्वाचे असते.

हेही वाचा: पंचाग 24 जून: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

तुम्ही जर का योगिनी एकादशीचे व्रत ठेवताना असाल तर या काही गोष्टी चुकूनही करू नये. चला त्याविषयी जाणून घेऊयात योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही करू नका हे काम

1) या दिवशी पहाटे उठून स्नान करावे. हे लक्षात ठेवा की या दिवशी संध्याकाळी झोपू नये आणि कोणत्याही गोष्टीबद्दल क्रोधित होऊ नये.

2) योगिनी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे सेवन करू नये. अशी मान्यता आहे की, या दिवशी तांदळाचे सेवन केल्याने मनुष्य रांगणाऱ्या प्राण्याच्या योनीत जन्म घेतो. या दिवशी पती-पत्नीने शारीरिक अंतर पाळावे. कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध टाळावेत.

3) योगिनी एकादशीला खूप महत्त्व आहे. म्हणूनच या दिवशी कोणीही बोलताना कठोर शब्दांचा वापर करू नये. तसेच कुणासोबत वाद किंवा भांडण करू नये.योगिनी एकादशीच्या दिवशी भाविकांनी साधे आणि सामान्य भोजन करावे.

Web Title: Yogini Ekadashi Know Its Story Significance Of This Auspicious Day

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top