Election Results : नितीन गडकरींचा दोन लाखांच्या मताधिक्‍याने विजय

नितीन गडकरीं
नितीन गडकरीं

नागपूर : केंद्रीय मंत्री तसेच भाजपचे हेवीवेट नेते नितीन गडकरी यांनी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचा दणदणित पराभव केला. गडकरी यांनी सुमारे दोन लाखांच्या मताधिक्‍याने निवडणूक जिंकून आपला गड कायम राखला. गडकरी यांना सहा लाख 37 हजार 605 तर नाना पटोले यांना 4 लाख 32 हजार 171 मते पडली. बसपाचे उमेदवार जमाल सिद्धिकी 30हजार 815 आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर डबरासे 25 हजार 40 मते मिळाली. पोस्टल बॅलेटची मोजणी व्हायची असल्याने यात थोडाफार फरक पडणार आहे. बसपा व वंचित आघाडीने तुलनेत कमी मते घेतल्याने कॉंग्रेसच्या आघाडीत वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत गडकरी यांचे मताधिक्‍य दोन लाख 84 हजार 848 इतके होते. यात मोठी कपात झाली असल्याने भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. गडकरी यांनी आपण तीन ते साडेतीन लाख मतांनी विजयी होऊ असा विश्‍वास व्यक्त केला होता. मात्र नाना पटोले यांनी यावेळी कॉंग्रेसची मते वाढविली. भाजपचे कार्यकर्ते विजयबाबात निश्‍चिंत असल्याचा फटकाही गडकरी यांना बसल्याची चर्चा आहे. पटोले यांनी दलित, मुस्लिम, कुणबी असा फॉर्म्युला वापरला होता. त्यात ते बरेच यशस्वी झाले असले तरी विजयाचा जादुई आकडा त्यांना गाठता आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com