#MeToo दिग्दर्शक हिरानींवर लैंगिक शोषणाचे आरोप

वृत्तसंस्था
रविवार, 13 जानेवारी 2019

आता या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत.

मुंबई : #MeToo या मोहिमेंतर्गत राजकीय आणि बॉलिवूडमधील अनेक व्यक्तींची नावे समोर आली आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांचे नाव समोर आले आहे. हिरानी यांच्यासोबत काही चित्रपटांमध्ये सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. त्यामुळे #MeToo मोहिमेत आणखी एका नव्या नावाचा समावेश झाला आहे.

राजकुमार हिरानी यांनी थ्री इडियट्स, पीके, संजू यांसारख्या विविध चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. आता त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप एका सहदिग्दर्शिकेने केला आहे. यामध्ये हिरानी यांनी मार्च ते सप्टेंबर 2018 या कालावधीत आपल्यासोबत गैरवर्तणूक केली, असा आरोप केला. हिरानी यांच्यावर हे आरोप एका मेलद्वारे करण्यात आले आहेत. तसेच संबंधित महिलेने हिरानी यांच्यासोबत निर्माते, दिग्दर्शक, विधू विनोद चोप्रा यांनाही हा मेल केला आहे. 

दरम्यान, राजकुमार हिरानी यांच्यावर झालेल्या या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर त्यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accusations of Sexual Harassment against Director Hirani