'क्रिस्टल' पुरस्कार मिळवणारी दीपिका ठरली एकमेव भारतीय अभिनेत्री !

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

र्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 'क्रिस्टल' पुरस्काराने भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार तिला मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीबद्दल देण्यात आला.

दाओस (स्वित्झर्लंड) : वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या 'क्रिस्टल' पुरस्काराने भारतीय अभिनेत्री दीपिका पदुकोणचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार तिला मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीबद्दल देण्यात आला. दाओस येथील सोहळ्यात "क्रिस्टल' पुरस्कार स्वीकारणारी ती एकमेव भारतीय अभिनेत्री होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

GRATITUDE!#crystalaward2020 #wef2020 @tlllfoundation

A post shared by Malti (@deepikapadukone) on

पुरस्कार स्वीकारल्यानंतर दीपिका म्हणाली की, ''हा पुरस्कार माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. जेव्हा हा पुरस्कार मी स्वीकारत आहे, त्या वेळीही कोणाचे वडील, भाऊ, सहकारी, आई किंवा मित्राने आत्महत्या करून स्वत:चा जीव गमावलेला असेल. दर चाळीस सेकंदाला जगात कोठे ना कोठे आत्महत्येची घटना घडते. मला स्वत: 15 फेब्रुवारी 2014 ला निराशेने ग्रासले होते. मी सतत रडत होते. सकाळी उठल्यानंतर डोक्‍यात एकच विचार यायचा, संपले सारे आता. चिंता आणि नैराश्‍य हे अन्य आजाराप्रमाणेच आहे. जागरूकता नसल्याने माझी स्थिती ढासळली होती. त्यानंतर मी काम करायचे निश्‍चित केले आणि किमान एकाचा तरी जीव वाचवू, असे ठरविले.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Crystal Award at Davos for her contributions to mental health awareness #deepikapadukone #instalove #ManavManglani

A post shared by Manav Manglani (@manav.manglani) on

पुढे ती म्हणाली, ''लिव, लव्ह लॉफ फाउंडेशनच्या माध्यमातून अन्य लोकांच्या मानसिक आजाराविषयीच्या अडचणी दूर केल्या जातात. शहरातील शाळांत या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मानसिक आरोग्यावरून देशभरात मोहीम आखली जात आहे. दीपिकाले आपल्या भाषणाच्या शेवटी मार्टिन लुथर किंग यांचा विचार मांडला. "जगात जे काही घडते, ते आशेवरच अवलंबून आहे.''

दीपिकाचा नुकताच 'छपाक' हा सिनेमा रिलिज झाला. दीपिकाने तिच्या नैराश्याविषयी अनेकदा खुलेपणाने चर्चा केली आहे. त्यावर मात करत दीपिकाने उभारी घेतली आणि कामामध्ये यश मिळवलं. दीपिकाला तिच्या प्रेमामध्ये धोका झाल्याने ती नैराश्यात गेली होती. पण, मागिल वर्षी रणवीर सिंगसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepika Padukone receives Crystal Award at Davos