खासदार नुसरत जहाँ विवाहबंधनात, शपथविधीला गैरहजर

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 जून 2019

पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत.

कोलकाताः पश्चिम बंगालच्या बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून लोकसभेवर पोहोचलेल्या खासदार व अभिनेत्री नुसरत जहाँ (वय 29) विवाहबंधनात अडकल्या आहेत.

कोलकात्याचे व्यावसायिक निखील जैन यांच्यासोबत नुसरत यांनी टर्कीमध्ये बुधवारी (ता. 19) विवाहबंधनात अडकल्या. नुसरत यांनी सोशल मीडियावर विवाहातील छायाचित्रे अपलोड केली आहेत. खासदार झाल्यानंतर नुसरत यांनी विवाहाची घोषणा केली होती. नव्या सरकारचे पहिले संसदीय सत्र 17 जूनला होते. यावेळी नव्याने खासदार झालेल्यांनी शपथ घेतली. मात्र, त्यावेळी नुसरत या टर्कीमध्ये विवाहसोहळ्यात असल्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत.

नुसरत व निखिल यांची भेट गेल्या वर्षी दुर्गा पूजेदरम्यान झाली होती. यावेळी दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले. रिलेशनशिपनंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. नुसरत यांनी विवाहसोहळ्यात प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केलेला लेहंगा परिधान केला होता. निखिलने सब्यसाचीनेच डिझाइन केलेली शेरवानी परिधान केली होती.

दरम्यान, पश्‍चिम बंगालमधील बशीरहाट मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. या निवडणूकीत नुसरतने तब्बल तीन लाख 50 हजार 369 मतांनी विजय मिळवला. नुसरतचा जन्म पश्‍चिम बंगालमधील कोलकतामध्ये 8 जानेवारी 1990 मध्ये झाला. बंगाली चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून नुसरतची ओळख आहे. कोलकातातील 'अवर लेडी क्वीन ऑफ द मिशन स्कूल'मधून तिने सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केले. भवानीपूर कॉलेजमधून तिने बी. कॉमची पदवी घेतली आहे. नुसरत सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर सतत ऍक्‍टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत फोटो व व्हिडिओ शेअर करत होती. सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत. 2011 मध्ये तिने बंगाली चित्रपट 'शोत्रू'मधून अभिनयाला सुरुवात केली. तिच्या अभिनयाची अनेकांनी प्रंशसा केली. पुढे तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत भूमिका निभावल्या. कोलकातामध्ये राहणाऱ्या व मॉडेल असलेल्या नुसरतने 'बोलो दुर्गा माई की', 'हर हर ब्योमकेश', 'जमाई 420' यांसारख्या चित्रपटांतून भूमिका साकार केल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

A woman who embraces her feminity... is the woman who knows her power !

A post shared by Nusrat (@nusratchirps) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: First time MP Nusrat Jahan gets married in Turkey, misses taking oath as MP