ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी निधन

वृत्तसंस्था
Thursday, 30 April 2020

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी निधन आज (ता. ३०) मुंबईत झाले. काल (ता. २९) बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे ६७ व्या वर्षी निधन आज (ता. ३०) मुंबईत झाले. काल (ता. २९) बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला होता. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या होत्या. 

 

१५ हजारांपेक्षा कमी पगार असणारांसाठी खूशखबर ! केंद्र सरकारने आणली 'ही' योजना

ऋषी कपूर यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. पत्‍नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. ९०च्या व २०००च्या दशकात नायकाच्या भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवुन ठेवतो तर अग्निपथमध्ये रौफ लाला हा भीतीदायक वाटतो. तर औरंगजेब सिनेमातील त्यांची भूमिका निर्दयी वाटते.

ऋषी कपूर यांनी खुल्लम खुल्ला या नावाचे आत्मचरित्रही लिहिले आहे. ऋषी कपूरसाठी किशोर कुमार, मोहम्मद रफी अशा अनेक गायकांनी गाणी म्हटली आणि ती सगळीच गाणी यशस्वी ठरली. या गाण्यांचे विविध सभागृहांत शोज होतात आणि त्या शोजना ऋषी कपूरची हजेरी असते, व त्यावेळी ते गाण्यांमागचे किस्से संगतात. २०१७ सालापर्यंत असे शोज मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये, बंगलोरमध्ये आणि पुण्यात होत होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Veteran Bollywood actor Rishi Kapoor passes away at 67

Tags
टॉपिकस
Topic Tags: