Video:..म्हणून काश्मीरमध्ये तिरंग्याचा सन्मान वाढला : मुख्यमंत्री

cm devendra fadnavis
cm devendra fadnavis

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याल्याने ७० वर्षांचे स्वप्न साकार झाले, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलम ३७० हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. गोरेगाव येथे आयोजित गृहमंत्री अमित शहा यांच्या व्याख्यान प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. अमित शहा यांनी या कार्यक्रमात कलम ३७० संदर्भात भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘आमचा काश्मीर कलम ३७० मुळे आमच्यापासून वेगळा ठेवण्यात आला होता. हे कलम रद्द व्हावं आणि काश्मीरपूर्णपणे भारतात विलीन व्हावं, असं स्वप्न ७० वर्षे बाळगलं होतं. शामाप्रसाद मुखर्जी यांनीही त्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. पण, एकाच देशात दोन देश निर्माण झाले होते. जनसंघ, भाजप आणि आमच्याविचारधारेच्या संघटना यासाठी प्रयत्न करत होते. ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम अमित शहा आणि मोदीजींनी करून दाखवलं.’

मुख्यमंत्री म्हणाले, ‘१५ ऑगस्टला यंदा पहिल्यांदाच तिरंगा सन्मानेने काश्मीरमध्ये फडकला. हा सन्मान देण्याचं काम अमित शहा यांनी केलंय. हे घडलं कसं हे समजून घेण्यासाठी अमित शहा यांना आम्ही निमंत्रित केलंय. त्याचे परिणाम काय आहेत? संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताची बाजू वरचढ होत आहे. भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळत आहे. आता निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे आपल्या प्रचाराची सुरुवात आज अमित शहा यांच्या निवडणुकांच्या सभेने होत आहे. त्यामुळे प्रचंड बहुमताने विजयी होण्याचा विश्वास मी व्यक्त करत आहे ’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com