किस घेताना अडकली जीभ; काय झालं पुढे?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑक्टोबर 2019

किस घेण्याच्या बहाण्याने जवळ घेत पतीने पत्नीची जीभ कापल्याची घटना गुरुवारी अहमदाबादच्या जुहापूरा भागामध्ये 
घडली होती.

अहमदाबाद : पती पत्नीच्या भांडणानंतर किस घेण्याच्या बहाण्याने जवळ घेत पतीने पत्नीची जीभ कापल्याची घटना गुरुवारी अहमदाबादच्या जुहापूरा भागामध्ये 
घडली होती. दरम्यान यात तक्रार दाखल करण्यात आलेल्या अय्युब मन्सुरीने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावत, किस घेताना जीभ अडकल्याने कापावी लागली 
असल्याचा दावा केला आहे.

संबधित महिला ही एका खाजगी रुग्णालयात परिचारीकेचे काम करत असून गुरुवारी (ता.17) तिचे पतीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर किस घेण्याचा बहाणा करत 
जवळ घेतले आणि जीभ कापली अशी तक्रार महिलेने वेजालपूर पोलिसांना दिली होती. तसेच असे केल्यानंतर तो बाहेरून कडी लावून निघून गेला ज्यानंतर मी माझ्या 
बहिणीला व्हिडिओ कॅालद्वारे माझी परिस्थिती दाखवून मदतीला बोलावल्याचे ही तिने तक्रारीत सांगितले होते.

दरम्यान पोलिसांनी अय्युब याला अटक केली असता चौकशीत त्याने किस करत असताना जीभ अडल्याने कापावी लागल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
 तसेच जीभ कापल्याने रक्तस्त्राव होऊ लागल्यने मी घाबरलो आणि त्यामुळे बाहेरुन कडी लावून गेलो होतो, असेही त्याने सांगितले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: while kissing he cut her tongue