अखेर चीनने केलं मान्य; ५ बेपत्ता भारतीय आपल्या ताब्यात असल्याची दिली कबुली

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 8 September 2020

अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीय तरुण  (५  youths of Arunachal allegedly abducted by PLA) बेपत्ता  झाल्याची घटना घडली होती.

नवी दिल्ली- अरुणाचल प्रदेशातून ५ भारतीय तरुण  (५  youths of Arunachal allegedly abducted by PLA) बेपत्ता  झाल्याची घटना घडली होती. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने (Peoples Liberation Army) त्यांचे अपहरण केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. हा आरोप खरा ठरला आहे. हे पाच तरुण आपल्या ताब्यात असल्याचं चीनने मान्य केले आहे. याआधी चीनने याबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं  होतं.  केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी मंगळवारी भारतीय तरुणांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. भारतीय सैन्याने पाठवलेल्या हॉटलाईन संदेशाला चीनच्या पीएलएने उत्तर दिलं आहे. अरुणाचलमधून बेपत्ता झालेले तरुण त्यांच्याकडे आल्याचे चीनने मान्य केले आहे. त्यांना भारताकडे सोपवण्यासाठीची औपचारिक प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत.

जगाने यापेक्षाही भयंकर महामारीसाठी तयार रहावं; WHO प्रमुखांचा इशारा

याआधी चीनने भारतीय तरुणांबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं होतं. चीनचे प्रवक्ते यावर म्हणाले होते की, 'चीनने कधीधी अरुणाचल प्रदेशला मान्यता दिली नाही. कारण तो चीनच्या दक्षिण तिबेटचा भाग आहे. भारताने पिपल्स लिबरेशन आर्मीवर ५ भारतीयांना सोडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, आमच्याकडे याबाबतची कोणतीही माहिती उपलब्ध नाही'.

अरुणाचल प्रदेशमधून ५ भारतीय नागरिक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आल्यानंतर भारताने पोलिसांची एक टीम मॅकमोहन रेषेला लागून असलेल्या सीमाभागात पाठवली होती. ही रेषा सुबनसिरी जिल्ह्याला तिबेटपासून वेगळे करते. बेपत्ता झालेले तरुण भारतीय जवानांना सामान पुरवण्याचं काम करायचे. ५ तरुण जंगलच्या दिशेने गेले होते, त्यानंतर चीनच्या जवानांनी त्यांचे अपहरण केले असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. टोच सिंगकम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तनु बाकेर आणि गारु डिरी असं बेपत्ता तरुणांची नावे आहेत.

कोरोना झालेल्या 18 दिवसांच्या बाळाला जन्मदात्यांनी सोडलं मृत्यूच्या दारात;...

बेपत्ता तरुणांपैकी एकाच्या भावाने फेसबुकवर पोस्ट केली होती. यात त्याने भारतीय सेनेच्या सेरा- ७ पेट्रोलिंग भागातून चीनच्या सैनिकांनी पाच जणांचे अपहरण केले असल्याचे लिहिले होते. ही जागा दापोर्जिया जिल्हा मुख्यालयापासून १२० किलोमीटर अंतरावर आहे. फेसबुक पोस्टनंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. नाचो गाव सेरा-७ पासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे तरुण वाहकाच्या स्वरुपात भारतीय सैनिकांसोबत जुडले गेले होते. शिवाय येथे मोबाईल नेटवर्क किंवा सिग्नल नसल्याने गाईडच्या स्वरुपात काम करायचे. गुरुवारी हे तरुण सीमा भागात गेले होते.

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ५  youths of Arunachal allegedly abducted by PLA in china territory said kiran rijeju