जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत जवान हुतात्मा; तर एक दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये काल (ता. 20) चकमक सुरू झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले असून एक जावान हुतात्मा झाला आहे. तर एक जवान जखमी झाला असून या जावानावर उपचार सुरू आहेत.  

बारामुल्लामधील कृष्णा घाटीमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्याने शोधमोहीम सुरू होती. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 

माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकी दरम्यान एसपीओ बिलाल हे हुतात्मा झाले आहेत तर एसआय अमरदीप परिहार हे जखमी झाले आहेत. अमरदीप यांना उपचारासाठी आर्मी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 soldier martyard and one terrorist killed in baramulla firing