हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात; खासगी बस दरीत कोसळून 10 ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात; शाळेची बस दरीत कोसळून 10 ठार

हिमाचल प्रदेशमध्ये मोठा अपघात; शाळेची बस दरीत कोसळून 10 ठार

शिमला : कुल्लू जिल्ह्यात शाळेची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातत 10 जण ठार झाले. निओली-शंशेर मार्गावरील सैंज खोऱ्यातील जंगला गावात बस कठड्यावरून दरीत कोसळली. जखमींना स्थानिक रुग्णालयात हलवण्यात येत असल्याची माहिती कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी दिली.

सकाळी 8.30 वाजता झालेल्या या अपघातात शाळकरी मुलांसह 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बसमध्ये 40 ते 50 जण होते. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव आणि मदतकार्य सुरू आहे.

आशुतोष गर्ग यांनी सांगितले की, सैंजला जाणारी बस जंगला गावाजवळ सकाळी 8.30 च्या सुमारास दरीत कोसळली. जिल्हा अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे.

Web Title: 10 Dead After A Private Bus Rolled Off A Cliff In Jangla

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..