Yogi Adityanath : स्वच्छता कर्मचाऱ्यांना दहा हजारांचा बोनस; आदित्यनाथ ,पाच लाखांचे विमा संरक्षण देण्याचीही घोषणा
Mahakumbh 2025 : महाकुंभमधील योगदान लक्षात घेऊन उत्तर प्रदेश सरकारने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी १०,००० रुपयांचा बोनस जाहीर केला. तसेच, पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि १६,००० रुपयांचे किमान वेतन लागू करण्याची घोषणा करण्यात आली.
प्रयागराज : महाकुंभच्या समाप्तीनंतर प्रयागराज येथे दाखल झालेले उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये बोनस जाहीर केला आहे.