अद्याप १०५ खासदारांनी घेतली नाही लस

संसदीय अधिवेशन १९ जुलैपासून सुरू करण्याची शिफारस संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने केली आहे.
Parliament
ParliamentSakal

नवी दिल्ली - संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी (Rainy Session) सर्व मंत्री (Minister) व खासदारांनी (MP) कोरोना लसीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस (Dose) घेणे आवश्यक असल्याचे निर्देश केंद्र सरकारने (Central Government) दिले आहेत. लोकसभा व राज्यसभेच्या सुमारे ५०० खासदारांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे सचिवालयांना कळविले आहे. अद्यापही १०५ खासदारांनी कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. (105 MPs have Not Vaccinated Yet)

संसदीय अधिवेशन १९ जुलैपासून सुरू करण्याची शिफारस संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समितीने केली आहे. आगामी अधिवेशनही कोरोना आरोग्य नियमांनुसारच होणार आहे. कोरोनाची दुसरी लाट सध्या आटोक्यात आल्याचे दिसत असले तरी धोका कायम आहे. त्यामुळे मागील वर्षातील हिवाळी अधिवेशनाप्रमाणेच आगामी अधिवेशनही दोन्ही सभागृहांत खासदारांची बैठक व्यवस्था करून चालविण्याचे प्रस्तावित आहे.

Parliament
चर्चेत नसलेल्या भारतातील 'या' कोरोना लशींबद्दल तुम्हाला माहितीय का?

लोकसभेचे सभापती ओम बिर्ला व राज्यसभाध्यक्ष एम वेंकय्या नायडू यांची लवकरच याबाबत बैठक होणार आहे. यात अंतिम निर्णय निश्चित केला जाईल. मार्च २०२० नंतर संसदेत बाहेरील अभ्यागतांचा प्रवेश बंद करण्यात आला असून या सलग तिसऱ्या अधिवेशनातही प्रेक्षक गॅलऱ्या रिकाम्याच राहातील. कारण पत्रकार कक्ष वगळता इतर सर्व गॅलऱ्यांमध्येही खासदारांची बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना आरोग्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. केवळ खासदारच नव्हे व संसदीय कर्मचारी, खासदारांचे सहाय्यक व संसदेच्या आवारात प्रवेश करण्यास पात्र असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.

विशेषतः लोकसभा-राज्यसभेच्या लॉबीत ज्या कर्मचाऱ्यांना जाणे आवश्यक आहे अशा भाषांतर, नोंदी घेणे, सुरक्षा यंत्रणा व सचिवालय कर्मचारी यांच्यासाठी तर दोन्ही टप्प्यातील लसीकरण अनिवार्यच करण्यात आले आहे. ग्रंथालय इमारतीतील बालयोगी सभागृहात व संसदीय विस्तारित कक्षात (ॲनेक्स) लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

किती खासदारांनी लस घेतली (लोकसभा-राज्यसभा या क्रमाने)

  • ३२० व १७९ दोन्ही डोस घेतलेले

  • १२४ व ३९ एक डोस घेतलेले

  • ९६ व ९ एकही डोस न घेतलेले

  • ५ कोरोनामुक्त खासदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com