भाजप सत्ता स्थापणार? कर्नाटकात 11 आमदारांचे राजीनामे

वृत्तसंस्था
Saturday, 6 July 2019

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली.

बंगळुरू : गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये राजकीय उलधापालथी होत आहेत. सत्ता स्थापनेनंतर कुमार स्वामींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जेडीएस सरकारची वाटचाल कायम अडचणीची राहिली आहे.

मुख्यमंत्री कुमारस्वामी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना आता काँग्रेसचे 8 तर जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामा देण्याची तयारी दाखविली आहे. विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांच्याकडे या अकरा आमदारांनी राजीनामे दिले, तर सत्तेतील सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी कर्नाटक विधानसभा निवडणूक पार पडली होती. तेव्हा राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपने 104 जागा मिळवून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देऊन सत्ता स्थापन केली. 

याविषयावर कर्नाटकातील काही प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांशी चर्चा करणार असून कोणीही राजीनामा देणार नाही, असे कर्नाटकचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे. तर आमच्याकडे कायम दुर्लक्ष होत असल्यामुळे आम्ही राजीनामा देत असल्याचे आमदार रामलिंगा रेड्डी यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 11 MLA resign in Karnataka