
नवी दिल्ली : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे मजबूत असून ते ठोस निर्णय घेते. देशात सरकारच्या पुढाकारानेच आर्थिक शिस्त प्रस्थापित झाली,’’ अशी स्तुतिसुमने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सरकारच्या अकरा वर्षांच्या कामगिरीचे प्रगतिपुस्तक मांडताना उधळली.