Odisha Elephant: ओडिशात १८ महिन्यांत ११४ हत्तींचा मृत्यू; सरकारची विधानसभेत माहिती, संरक्षणाचे प्रयत्न, काय आहेत कारणे?

Human-Elephant conflict impact in Odisha forests : ओडिशातील हत्तींच्या मृत्यूंमागील कारणांचा शोध; विजेचा धक्का ठरला प्रमुख कारण
Forest officials monitor elephant habitats in Odisha amid rising concerns over elephant deaths.

Forest officials monitor elephant habitats in Odisha amid rising concerns over elephant deaths.

Sakal

Updated on

-स्मृती सागरिका कानुनगो

भुवनेश्‍वर: ओडिशामधील घनदाट जंगले, डोंगरदऱ्या आणि नदी किनारी स्वच्छंद फिरणारे हत्ती हे येथील समृद्ध निसर्गाचे प्रतीक मानले जाते. सिमलिपाल राष्ट्रीय उद्यानाच्या पानझडी जंगलांपासून अंगुल आणि ढेंकनालच्या वनक्षेत्रांपर्यंत पसरलेला प्रदेश हा हत्तींसाठी आदर्श अधिवास मानला जातो. मात्र, राज्य सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीतून एक चिंताजनक बाब उघड झाली आहे. गेल्या दीड वर्षांत विविध कारणांमुळे ओडिशात ११४ हत्तींचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याचे वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री गणेश राम सिंह खुंटिया यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यामुळे राज्यातील हत्ती संरक्षणाबाबत नव्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com