
अल्पवयीन मुलीवर बलात्कार,१२ वर्षीय मुलाला POCSO अंतर्गत अटक
तंजावर : तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात एका 12 वर्षीय मुलाला किशोरवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध ठेवून तिला गरोदर केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने एका मुलीला जन्म दिला असून, पोलिसांनी 12 वर्षीय अल्पवयीन मुलाला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा 2012 (POCSO) अंतर्गत अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकाच शाळेत शिकत होते. तर आरोपी पीडिता शेजारी शेजारी राहतात.
हेही वाचा: Enough is Enough! अंत पाहू नका, राऊतांचं ट्वीट
पीडितेच्या तक्रारीवरून अल्पवयीन आरोपीला अटक
ओटीपोटात दुखू लागल्याने मुलीच्या पालकांनी मुलीला 16 एप्रिलला दवाखान्यात दाखल केले. त्यानंतर पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणात आणखी कोणी सामील आहे का?, याचा तपास पोलीस करत आहेत. असून, पीडितेच्या आरोपांनंतर पोलिसांनी मुलाला पोक्सो कायद्याच्या Pocso Act Section 5 (1) and 5 (j) (ii)) कलम 5 (1) आणि 5 (J) (ii) अंतर्गत अटक केली आहे.
Web Title: 12 Year Old Boy Booked Under Pocso Act For Raping Impregnating 17 Year Old Girl In Tamil Nadu
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..