
संभळ : गेल्या काही दिवसांपासून मशिदीच्या सर्वेक्षणाच्या आदेशामुळे चर्चेत आलेल्या संभळमधील चांदौसी भागात लक्ष्मण गंज परिसरात उत्खननादरम्यान पायऱ्या असलेली विहीर सापडली. ही ४०० चौ. मीटरवरील विहीर अंदाजे १२५ ते १५० वर्षांपूर्वीची असल्याचा अंदाज आहे. उत्खननाने हे काम शनिवारी (ता.२१) सुरू करण्यात आले, अशी माहिती चांदौसी नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी कृष्णकुमार सोनकर यांनी दिली.