jp nadda
jp naddasakal media

सरकारचा मोठा निर्णय! 13 कंपन्यांना लस निर्मितीची परवानगी

- कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
Summary

कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

नवी दिल्ली- कोरोना महामारीवर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोरोना विषाणूला हरवायचं असेल तर लसीकरण हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यादृष्टीने भाजप सरकार काम करताना दिसत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP President JP Nadda) यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. देशात सुरुवातील फक्त दोन कंपन्यांना लस निर्मितीला परवानगी होती, पण आता देशातील 13 कंपन्यांना लस निर्मितीस परवानगी मिळाली आहे, अशी माहिती नड्डा यांनी दिली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (13 companies have been permitted to produce COVID vaccines BJP President JP Nadda)

जेपी नड्डा यांनी सांगितलं की, 'सध्या 13 कंपन्यांना लस निर्मितीला परवानगी दिली आहे. येत्या काळात आणखी 19 कंपन्यांना निर्मितीची परवानगी दिली जाईल. भारत बायोटेकची उत्पादन क्षमताही वाढवली जात आहे. सध्या भारत बायोटेक दर महिन्याला 1.3 कोटी लशींची निर्मिती करत आहे. येत्या काही महिन्यात यात वाढ होऊन ऑक्टोबरपर्यंत कंपनी दर महिन्याला 10 कोटी लशींचे उत्पादन करेल'. जे.पी. नड्डा यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक सरकारचा आत्मविश्वास तोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. विरोधकांनी लसीबाबत प्रश्न उपस्थित केले होते. पण, हेच विरोधक आता लस म्हणून ओरडत आहेत, असं ते म्हणाले.

jp nadda
'अजितदादा... सांभाळून बोला,आम्ही फाटके आहोत'; पाटलांचा इशारा

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. यावरुनही जे.पी. नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण हा दिवस 'सेवा दिवस' म्हणून साजरा करत आहोत. भाजप कार्यकर्ते आज देशातील 1 लाख गावांमध्ये सेवा देतील. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना काळात गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले आहे. 'सेवा हेच संघटन'खाली भाजपने अनेकांना मदत केली आहे, असं ते म्हणाले.

jp nadda
'100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीशी देश ताकदीने लढतोय'

दरम्यान,एनडीए सरकारला केंद्रात सत्तेत येऊन ७ वर्षे पूर्ण झाली, यावर पंतप्रधान मोदींनी 'मन की बात'मधून संवाद साधला. या सात वर्षात जे काही साध्य करता आलं, ते सर्व देशाचं आहे. गेल्या शंभर वर्षात आलेल्या सर्व संकटांचा देशाने मुकाबला केला. आताही सर्वात मोठ्या महामारीचा संपूर्ण देश यशस्वीपणे सामना करतोय, असं मोदी म्हणाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान बचाव कार्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांचे मोदींनी आभार मानले. मोदी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यात अनेक नागरिकांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. जेव्हा दुसरी लाट आली, तेव्हा अचानक ऑक्सिजनची मागणी कित्येक पटीने वाढू लागली. वैद्यकीय ऑक्सिजन देशातील विविध भागात पोहचविणे हे एक मोठे आव्हान होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com