आसाममध्ये विषारी मशरुम खाल्लाने 16 लोकांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मशरुम

आसाममध्ये विषारी मशरुम खाल्लाने 16 लोकांचा मृत्यू

दिसपूर : आसाममधील चार जिल्ह्यात मागील दोन दिवसांत मशरुम खाल्ल्याने तब्बल सोळा लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी खाल्लेल्या मशरुममध्ये विष असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना अप्पर आसाममध्ये घडली असल्याचं आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्रसन्ता दिहिंग्या यांनी सांगितले.

या सर्व रुग्णांवर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉ. दिहिंग्या यांनी सांगितलं. ते म्हणाले की, अप्पर आसाममधील चरईदेव, दिब्रुगड, शिवसागर आणि तिनसुकिया या चार जिल्ह्यातील तब्बल ३५ विषबाधित रुग्णांना मागच्या पाच दिवसात आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातील १३ रुग्णांचा मागील दोन दिवसांत मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान दाखल करण्यात आलेल्या आणि मृत पावलेल्या रुग्णांनी जंगली विषारी मशरुम खाण्यायोग्य समजून खाल्लं आहे. त्यानंतर त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास झाला. मग त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी सोमवारी ४ आणि मंगळवारी ९ लोकांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

मृतांपैकी चरईदेव जिल्ह्यातील सोनारीमधील सात बालकांचा सामावेश आहे. दिब्रुगडमधील पाच तर शिवसागर जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी बहुतांश हे चहाबाग समाजातील असल्याचं सांगितलंय. दरवर्षी लोकं या जंगली आणि विषारी मशरुमचं सेवन करतात. त्यांना विषारी आणि बिनविषारी मशरुम ओळखण्यात येत नसल्याने असे प्रकार घडतात असं डॉक्टरांनी सांगितलं.

Web Title: 13 Death In Assam Poison Mushrooms Consuming

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AssamdeathPoisoning
go to top