अटलजी आणि 13 क्रमांक काय आहे नातं?

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीतील सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. 
पत्रकार ते पंतप्रधान असा प्रवास करणाऱ्या अटलजींच्या राजकीय आयुष्यात 13 या क्रमांकाला खुप महत्त्व आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज पहिला स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त नवी दिल्लीतील सदैव अटल स्मृती स्थळावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. १६ ऑगस्ट २०१८ रोजी वाजपेयींनी अखेरचा श्वास घेतला. त्याआधी बराच कालावधीपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. पत्रकार ते पंतप्रधान असा प्रवास करणाऱ्या अटलजींच्या राजकीय आयुष्यात 13 या क्रमांकाला खुप महत्त्व आहे.

अटलबिहारी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या आकड्याभोवतीच फिरताना दिसतात. अनेकदा या क्रमांकामुळे वाजपेयींना फटका बसला. मात्र वाजपेयींनी याच आकड्याच्या मदतीनं अनेक संकटांवर मातही केली.

अटलबिहारी वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचं सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळलं.

वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 13 क्रमांक तुमच्यासाठी अशुभ आहे, असं सहकाऱ्यांनी वाजपेयींना सांगितलं. मात्र तरीही वाजपेयींनी ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 13 number played very important role in former pm atal bihari vajpayees life