Kolkata Fire : कोलकत्यातील हॉटेलला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू
Fire Accident : कोलकत्यातील बुराबाजार भागातील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा मृत्यू झाला असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे.
कोलकता : मध्य कोलकतामधील बुराबाजार येथील मेचुआपट्टी भागात एका हॉटेलला मंगळवारी (ता.२९) रात्री भीषण आग लागली. यात किमान १४ जणांचा मृत्यू झाला, तर अन्य १३ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी आज दिली.