#14AugustBlackDay : बलुचिस्तानसाठी 14 ऑगस्ट 'काळा दिवस'!

वृत्तसंस्था
Wednesday, 14 August 2019

भारताचा बलुचिस्तान वेगळे होण्यास पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असलेला 14 ऑगस्ट काळा दिवस म्हणून बलुचिस्तानी साजरा करक आहेत. #14AugustBlackDay आणि #BalochistanSolidarityDay हो हॅशटॅग ट्रेडिंग आहेत. 

नवी दिल्ली : पाकिस्तानचा आज (ता. 14) स्वातंत्र्यदिन असतो. भारतापासून वेगळे होत पाकिस्तानने नवे राष्ट्र निर्माण केले आणि बलुचिस्तानलाही आपल्यात सामावून घेतले. पण बलुचिस्तान वेगळ्या देशाची मागणी करत असून पाकिस्तान त्यास परवानगी देत नाही. भारताचा बलुचिस्तान वेगळे होण्यास पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असलेला 14 ऑगस्ट काळा दिवस म्हणून बलुचिस्तानी साजरा करक आहेत. #14AugustBlackDay आणि #BalochistanSolidarityDay हो हॅशटॅग ट्रेडिंग आहेत. 

 

बलुचिस्तानमधील नागरिक आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत आहेत. मोदींनी कलम 370 बद्दल जो धाडसी निर्णय घेतला त्याविषयी जगातील कोणत्याही देशाने आक्षेप घेतला नाही. पाकिस्तान गेल्या 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळे मोदीच आमचे हिरो आहेत. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मदत केली, तर त्याने खूप फायदे होतील, असे नायला कादरी यांनी म्हटले आहे.

 

 

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 14AugustBlackDay hashtag trending on twitter related to Balochistan