15 ते १८ वयोगटातील १ कोटी डोस पूर्ण - केंद्रीय आरोग्य मंत्री

15-18 वयोगटातील 1 कोटीहून अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
15 ते १८ वयोगटातील १ कोटी डोस पूर्ण - केंद्रीय आरोग्य मंत्री
Sakal

नवी दिल्ली: 15-18 वयोगटातील 1 कोटीहून अधिक तरुणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. अलीकडच्या काही दिवसात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव होत असून नुकतेच 18 वर्षाखालील मुलांना कोविड लस देण्यास सुरुवात झाली आहे. (Over 1 crore youngsters between 15-18 age group have received 1st dose of covid19 vaccine: Health Minister Mansukh Mandaviya)

२५ डिसेंबर २०२१ रोजी पंतप्रधान मोदींनी घोषणा केली होती की, भारतात ३ जानेवारीपासून १५-१८ वयोगटासाठी कोविड-१९ लसीकरण सुरू होईल. भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही एकमेव लस केंद्रीय आरोग्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या वयोगटासाठी उपलब्ध आहे. लसीकरण मोहिमेच्या पहिल्या दिवशी, भारताने लसीचे 40 लाख डोस दिले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आगामी काळात तरुणांना लसीकरण करण्याचे आवाहन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com