अखेर OBC यादीत 15 नव्या जाती समाविष्ट

वृत्तसंस्था
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये 15 नव्या जातींचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत सरकारने सूचना प्रसिद्ध केली आहे. 

राष्ट्रीय मागास प्रवर्ग आयोगाने (NCBC) आठ राज्यांच्या संदर्भात एकूण 28 बदल सुचविले होते. त्यामध्ये महाराष्ट्रासह आसाम, बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, जम्मू-काश्मीर आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश होता. या 28 राज्यांपैकी 15 जातींचा समावेश करण्यात आला आहे. 

बिहारमधील गधेरी तथा इतफरोश, झारखंडमधील झोरा आणि जम्मू-काश्मीरमधील लबाना या नव्या जातींचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. नामसाधर्म्य असलेल्या किंवा यादीत आधीच समाविष्ट असणाऱ्या जातींच्या उपजाती अशा 9 आहेत, तर याशिवाय 4 जातींच्या नावातील दुरुस्त्या करण्यात आल्या. 

"आयोगाने (NCBC) व जम्मू-काश्मीर सरकारने केलेल्या शिफारशी केंद्र सरकारने विचारात घेऊन त्या स्वीकारल्या. केंद्राच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीतील हा समावेश व दुरुस्तीबाबत सूचना जारी केली आहे," अशी माहिती सहसचिव बी.एल. मीना यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहीर सूचनेमध्ये म्हटले आहे.

Web Title: 15 new castes in central OBC list