
आता साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात होणार आहे.
लखनौ : कोरोनामुळे संपूर्ण जगच लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम अनेकांवर होत आहे. परंतु, याचा परिणाम आता थेट सरकारी कर्मचाऱ्यांवरही होणार आहे. महागाई भत्त्यात होणारी वाढ केंद्र सरकारने थांबवली होती. त्यानंतर आता साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा ६ वा भत्ता थांबवला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ही एक वाईट बातमी असून उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी १६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणारे ६ वा भत्ता थांबवला आहे. सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. युपीचे अपर मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. कोरोनामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाली असून कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हे पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.
२० लाख कोटी लिहताना अर्थमंत्र्यांकडूनच चूक; मागितली माफी
दरम्यान, या कर्मचाऱ्यांपैकी १० हजारहून अधिक कर्मचा्यांना किमान ६२५ रुपये आणि जास्तीत जास्त २००० रुपयांचा सचिवालय भत्ता मिळतो. तसेच, शहर भरपाई भत्ता हा जवळपास १ लाख कर्मचाऱ्यांना किमान ३४० आणि जास्तीत जास्त ९०० रुपये मिळतो. राज्यातील प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यास ४०० रुपये विशेष भत्ता मिळतो. पीडब्ल्यूडी कर्मचार्यांना संशोधन, सुव्यवस्थित डिझाइन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना या भत्ता मिळतो. आय अँड पी, सिंचन विभागात शिस्तबद्ध भत्ता म्हणून ५०० हून अधिक कर्मचार्यांना लाभ मिळतो. भविष्य निर्वाह खाती सांभाळणार्या कर्मचार्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचार्यांना लाभ मिळतो.