देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट 

corona
corona

नवी दिल्ली - भारतातातील कोरोनाबाधितांची संख्या आज साडेअकरा हजारांच्या घरात गेली असून त्याचवेळी तेराशेपेक्षाही अधिक रूग्ण बरे झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या काळात देशातील सातशेहून जास्त जिल्हे तीन भागांमध्ये विभाजित करून नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यात येईल, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. यातील १७० जिल्हे हॉटस्पॉट, तर २०७ जिल्हे नॉन हॉटस्पॉट या श्रेणीतील आहेत. उर्वरित जिल्ह्यांतील लॉकडाउनचे निर्बंध हटविण्यात येणार आहेत. 

वाढीव लॉकडाउनच्या काळात प्रवासी रेल्वेसेवा बंद असली तरी माल वाहतूक सुरू राहणार आहे आणि या माल वाहतुकीतून रेल्वेने कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आतापर्यंत १ हजार ३०६ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासांत बरे होणाऱ्यांची संख्या वाढून २७० वर गेली आहे. देशात ११ हजार ४३९ कोरोनाग्रस्त असून १ हजार ३०६ लोक बरे झाले आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३७७ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत १ हजार ०७६ नवे रुग्ण आढळले असून ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार ८०१ वर पोचली आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात ११७ नवे रुग्ण आढळले असून त्यात ६६ मुंबईचे आणि ४४ पुण्याचे आहेत. 

चाचण्या वाढविणे गरजेचे 
कोरोनाग्रस्तांची देशातील झपाट्याने वाढणारी आकडेवारी पाहता चाचण्यांचा वेग आणि संख्याही वाढविण्याची नितांत गरज असल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे. यासाठी आवश्यक असलेल्या रॅपिड टेस्टिंग किटची वाट पाहणे मात्र सरकारच्या पातळीवर अजून सुरूच आहे. अशा ३७ लाख किट भारतात येण्याची अपेक्षा आहे. यासाठी ५ एप्रिल, मग १० एप्रिल, नंतर १५ एप्रिल अशा तारखांवर तारखा देण्यात येत आहेत तरी चीनने अजून अशी किट पाठवली की नाही याचा स्पष्ट खुलासा सरकारकडून करण्यात आलेला नाही. 

वटवाघळांतून संसर्ग नाही 
दरम्यान पाच राज्यांतील ५८६ वटवाघळांची तपासणी असता २५ वर्षे या वटवाघळांमध्ये कोरोनाचा विषाणू वैज्ञानिकांना आढळून आला आहे. मात्र तो म्हणजे covid-१९ नाही असाही खुलासा करण्यात आला. आयसीएमआरचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या म्हणण्यानुसार पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संशोधन संस्थेमध्ये मागील तीन वर्षांपासून यावर संशोधन होते आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com