esakal | बस-ट्रकचा भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बस-ट्रकचा भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू

- तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहरात झाला अपघात.

बस-ट्रकचा भीषण अपघात; 19 जणांचा मृत्यू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

चेन्नई : तमिळनाडूतील तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी शहरात बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यामध्ये 19 जणांचा मृत्यू झाला असून, 20 पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त बस ही केरळ राज्य परिवहन महामंडळाची असल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केरळची ही बस बंगळुरुपासून एर्नाकुलम येथे जात होती. त्यादरम्यान ही घटना घडली. मृतांमध्ये 14 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत अविनाशीचे उप-तहसीलदार यांनी सांगितले, की 19 जणांचा यामध्ये मृत्यू झाला. ही घटना तिरापूर जिल्हा घडली.

आवश्यक मदत करणार : मुख्यमंत्री

पलक्कड जिल्हाधिकारी यांना अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या आहेत. यातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सध्या केले जात आहे, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिली. 

जखमींवर उपचार सुरु 

यातील जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी पलाक्कड, थ्रीस्सूर आणि एर्नाकुलम येथे दाखल करण्यात येत आहे. त्यांच्यावर आता उपचार सुरु आहेत, अशी माहिती केरळचे परिवहनमंत्री ए. के. ससिंध्रन यांनी दिली आहे. 

बसमध्ये 48 प्रवासी 

या बसमध्ये 48 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.