
नवी दिल्ली : देशातील विविध क्षेत्रांंतील १९७ मान्यवरांनी पंतप्रधानांना खुले पत्र लिहून अलीकडेच लिहील्या गेलेल्या अशाच प्रकारच्या पत्रावर टीका केली आहे. ८ निवृत्त न्यायाधीश, ९७ निवृत्त सनदी अधिकारी व ९२ निवृत्त सशस्त्र दलाचे जवान यांच्या स्वाक्षऱया असलेल्या या पत्रात, द्वेषाचे राजकारण संपविण्याचे आवाहन करणारे संबंधित पत्र हा ‘एका स्वयंघोषित समूहाद्वारे द्वेषाच्या अजेंड्याचा‘ भाग होता असे प्रती टीकास्त्र सोडले आहे. सरकारच्या बाजूने लिहीलेल्या या पत्रावर विविध मान्यवरांची नावे असून भाजपने ते पत्र आज सार्वजनिक केले. देशातील द्वेषपूर्म व भयाच्या वातावरणाबाबत चिंता व्यक्त करणारे पत्र काही मान्यवरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहीले होते. सध्याच्या राजवटीत देशातील वातावरण चिंता करावी असे झाल्याचे त्या पत्रात म्हटले होते.
त्या पत्रापाठोपाठ आता सरकारच्या बाजूने असेच पत्र प्रसारित करण्यात आले आहे. त्यात यापूर्वीचे पत्र लिहीणाऱयांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.पंतप्रधानांना पत्र लिहून सरकारवर विनाकारण टीका करणे व जे नाही असे वातावरण देशात तयार झाल्याची ओरड करणे हा स्वतःकडे माध्यमांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रकार असल्याचे सांगून या पत्रात म्हटले आहे की अशी खोटी ओरड कितीही झाली तरी देशाची जनता पंतप्रधान मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे हे ५ राज्यांच्या निवडणूक निकालांनी पुन्हा दाखवून दिले असेही या पत्रात म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतरचा हिंसाचार इतका गंभीर होता की कोलकता न्यायालयाला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगातर्फे स्वतंत्र तपास करण्याचे निर्देश द्यावे लागले. मात्र या पूर्वग्रहदूषीत गटाच्या पत्रात त्याचा उल्लेखही नाही. दुसरीकडे रामनवमी, हनुमान जयंती यावेळी काही राज्यांत निर्माण झालेल्या तणावाचा उल्लेखही चुकीच्या पध्दतीने त्यांच्या पत्रात केला गेला त्यावरून त्यांना घटनात्मक वर्तणुकीची किती काळजी आहे हे दिसते असे उपरोधिकपणे म्हटले आहे.
भाजप सरकारच्या काळात देशात धार्मिक दंगली व घटनांमध्ये घट झाली व जनतेने याची प्रशंसा केली आहे. अशा काही घटनांचे भांडवल करून साऱया देशातील वातावरण खराब झाल्याची मतलबी तक्रार पंतप्रधानांना पत्र लिहून करणे गैर आहे. जागतिक समूहांचे लक्ष आकषिर्त करून घेण्याच्या असा प्रयत्नांत देशाची प्रतिमा खराब होते याचे भान पत्रलेखकांना नाही असेही या पत्रात म्हटले आहे. व्यक्तिगत द्वेष व पूर्वग्रह यापासून स्वतःला दूर केले तर वर्तमान सरकारची जनसेवा व देशातील सामान्य शांतीपूर्म वातावरण याचा अनुभव येईल पण निवडक व राजकीय टीका करून या गटाने आपली शक्ती व्यवहार्य व विधायक सूचना देण्यासाठी करावी अशीही सूचना ताज्या पत्रात करण्यात आली आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.