20 killed in lightning: गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर! वीज पडून 20 जणांचा मृत्यू, अलर्ट जारी

गुजरामध्ये वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
20 killed in lightning
20 killed in lightningEsakal

गुजरातमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुजरामध्ये वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

राज्य आपत्कालीन ऑपरेशन केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गुजरातमधील विविध भागात वीज पडण्याच्या घटनांची नोंद झाली आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे.

20 killed in lightning
Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

गुजरातमधील दाहोदमध्ये सर्वाधिक चार जणांचा मृत्यू झाला. भरुचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाड, खेडा, मेहसाणा, पंचमहाल, साबरकांठा, सुरत, सुरेंद्रनगर, देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

या दुःखद जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मदतीचे आश्वासन दिले आहेत. तर स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्य करत आहे.

"गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने मला खूप दु:ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या अपरिमित हानीबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासनाने मदतकार्यात गुंतले आहेत, जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे,” असं शाह यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

SEOC माहितीनुसार, गुजरातच्या सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारपासून पावसामध्ये हळूहळू घट होण्याचा अंदाज वर्तवला आहे.

20 killed in lightning
Pune Rain News : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला गारपिटीच्या पावसाने झोडपले

महाराष्ट्रातील नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसासोबतच गारपीटही झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकमधील निफाड, लासलगाव, मनमाड, चांदवड परिसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. त्यामुळे द्राक्ष व कांदा लागवडीचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. दरम्यान, नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com