रायपूर - नक्षलवादाविरोधातील लढाईमध्ये मोठे यश मिळाले असून छत्तीसगडच्या गरिबंद जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री २० नक्षलवाद्यांना ठार केले असून त्यामध्ये म्होरक्या जयराम रेड्डी ऊर्फ चलपती याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. .या मोहिमेबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना शाबासकी दिली आहे. छत्तीसगड- ओडिशाच्या सीमेवर ही चकमक झाल्याचे समजते. या मोहिमेमध्ये जिल्हा राखीव दल (डीआरजी), केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), छत्तीसगडमधील कोबरा कमांडर आणि ओडिशाच्या विशेष कृती समूहाचे जवान सहभागी झाले होते.छत्तीसगडच्या कुलारीघाट जंगलामध्ये काही नक्षलवादी हे दडून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागामध्ये सुरक्षा दलांनी शोध मोहीम हाती घेतली होती. ओडिशाच्या नौपाडा जिल्ह्यापासून पाच किलोमीटर अंतरावर ही चकमक घडली. ज्या ठिकाणी ही चकमक झाली तेथील घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणावर दारूगोळा, अग्निशस्त्रे, स्वयंचिलत शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत..या भागामध्ये मंगळवारी देखील शोध मोहीम सुरू होती अशी माहिती सूत्रांनी दिली. नक्षलवाद्यांच्या कारवायांना हा सर्वांत मोठा धक्का असल्याचे गृहमंत्री शहा यांनी म्हटले आहे. नक्षलवादमुक्त भारत हा आमचा निर्धार असून सुरक्षा दलांच्या पुढाकारामुळे देशातील नक्षलवाद आज अखेरची घटका मोजत आहे असे त्यांनी सांगितले.सुरक्षा दलांच्या या कारवाईचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी देखील कौतुक केले असून केंद्र आणि राज्यातील डबल इंजिनचे सरकार हे पुढील वर्षापर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करेल यात शंकाच नाही असे त्यांनी म्हटले आहे. या वर्षभरामध्ये छत्तीसगडमधील कारवायांत ४० नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला आहे..दरम्यान मागील वर्षभरात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर निर्णायक प्रहार करण्यात आले असून तब्बल दोनशे जणांचा खातमा करण्यात आला आहे. बस्तर, दंतेवाडा, कांकेर, विजापूर, नारायणपूर, कोंडगाव आणि सुकमा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात आल्या आहेत. तब्बल आठशे नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली असून असून ८०२ जणांनी शस्त्रत्याग केला आहे. या चकमकीमध्ये अठरा सुरक्षा दलांना प्राण गमवावे लागले आहेत..कोण आहे चलपती?नक्षलवाद्यांचा म्होरक्या चलपती हा आंध्रप्रदेशच्या चित्तूर जिल्ह्याचा रहिवासी असून तो नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा ज्येष्ठ सदस्य होता. नक्षलवादी कारवायांबाबत निर्णय घेण्याचे काम हीच समिती करते. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात अबूजमाडच्या जंगलामध्ये त्याची दहशत होती.या भागातील सुरक्षा दलांच्या कारवाया वाढल्याने त्याने स्वतःची तुकडी अन्यत्र हलविली होती. नक्षलवाद्यांनी चलपतीच्या सुरक्षेसाठी एक वेगळे पथकही नेमले होते त्यामध्ये आठ ते दहा सुरक्षा रक्षकांचा समावेश होता. काही दिवसांपूर्वीच त्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.