मुझफ्फरनगरच्या दंगलखोरांना योगी सरकार 'माफ करणार' !

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 मार्च 2018

उत्तर प्रदेशमध्ये 2013 भडकलेल्या जातीय दंगलीदरम्यान अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 13 हत्या आणि 11 हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीत 62 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही दंगल सप्टेंबर 2017 मध्ये झाली.

लखनौ : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर आणि शामली येथे झालेल्या दंगलीनंतर अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यवाही सुरु केली आहे. या दंगलीदरम्यान दाखल झालेले 131 खटले मागे घेण्यात येणार आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये 2013 भडकलेल्या जातीय दंगलीदरम्यान अनेक हिंदूंवर गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये 13 हत्या आणि 11 हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. हिंदू-मुस्लिम जातीय दंगलीत 62 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. ही दंगल सप्टेंबर 2017 मध्ये झाली. त्यादरम्यान दंगल घडविणाऱ्या सर्वांविरोधात भारतीय दंडविधान कलम 153 ए अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या दंगलीदरम्यान गुन्हे दाखल करण्यात आलेल्या सर्वांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अशी मागणी केली जात होती. 

तसेच फेब्रुवारी महिन्यात मुझफ्फरनगर आणि शामलीचे खाप नेते भाजप खासदार संजीव कल्याण यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुझफ्फरनगर दंगलीदरम्यान दाखल झालेले 402 खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. या सर्वांच्या विनंतीनुसार योगी आदित्यनाथ यांनी गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही सुरु केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2013 Muzaffarnagar riots Yogi Adityanath led UP government commences process to withdraw 131 riot cases