...तर तुम्हाला पंतप्रधान, राष्ट्रपतीही वाचवू शकणार नाही; मिथून चक्रवर्तींचा ममतांना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mithun chakraborty - Mamata Banerjee

...तर तुम्हाला पंतप्रधान, राष्ट्रपतीही वाचवू शकणार नाही; मिथून चक्रवर्तींचा ममतांना इशारा

नवी दिल्ली - सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे २१ आमदार अजुनही आपल्या थेट संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते आणि अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी पुन्हा एकदा केला आहे. कोलकाता येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना मिथुन चक्रवर्ती बोलत होते. (Mamata Banerjee news in Marathi)

हेही वाचा: Video : भाजपच्या आमदारांकडे वेळंच वेळ! कामकाजावेळी एक तंबाखू तर दुसरा...

यावेळी मिथून चक्रवर्ती म्हणाले की, टीएमसीचे २१ आमदार अजूनही माझ्या संपर्कात आहेत, मी हे आधीही बोललो आणि पुन्हा म्हणतो, मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. फक्त थोडी वाट पाहा, असही ते म्हणाले. तृणमूलच्या नेत्यांना घेण्यावर पक्षांतर्गत आक्षेप आहेत याची मला जाणीव असल्याचंही चक्रवर्ती यांनी नमूद केलं.

शनिवारी, दुर्गापूजेच्या अगोदर, मिथुन चक्रवर्ती हे भाजप नेत्यांची बैठक घेण्यासाठी शहरात होते. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, टीएमसीच्या इच्छुक आमदारांची संख्या वाढली आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर चक्रवर्ती म्हणाले, “मी तुम्हाला अचूक संख्या सांगणार नाही, परंतु संख्या 21 पेक्षा कमी नाही असे म्हणू शकतो”

मिथुन चक्रवर्ती यांनी सीबीआय आणि ईडीच्या "गैरवापराबाबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरही भाष्य केले. ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की केंद्रीय एजन्सीचा "गैरवापरामागे पंतप्रधान नरेंद्र मोदीचा हात आहे असे मला वाटत नाही.

हेही वाचा: Congress : निवडणुकीत चुरस वाढत असतानाच पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान; गेहलोतांबाबत म्हणाले..

चक्रवर्ती म्हणाले की, ममता बॅनर्जी बरोबर बोलत आहेत. खरंच, सीबीआय, ईडी मागे लावण्याचं काम पंतप्रधान करत नाहीत. पण मी आधीच सांगितले की, तुम्ही काही चुकीचे केले नसेल, तुम्ही स्वच्छ असाल, तुम्हाला घरी शांत झोप लागू शकते. काहीही होणार नाही. पण जर काही पुरावे असतील तर पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीही तुम्हाला वाचवू शकत नाहीत.