
विजापूर : छत्तीसगडमधील तेलंगण सीमेनजीकच्या विजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन संकल्प’ या व्यापक नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान बुधवारी झालेल्या चकमकीत २२ नक्षलवाद्यांचा खातमा करण्यात आला. उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती. २१ एप्रिलपासून सुरू केलेल्या या मोहिमेत करेगुट्टा परिसरातील घनदाट जंगलातील टेकड्यांवर सुरक्षा दले व नक्षलवाद्यांत आत्तापर्यंत ३५ चकमकी झाल्या आहेत.