२२ वर्षीय तरुणानं सावत्र आईसोबत केलं लग्न, वडिलांची पोलिसांत धाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Man Married With Stepmother

२२ वर्षीय तरुणानं सावत्र आईसोबत केलं लग्न, वडिलांची पोलिसांत धाव

डेहराडून : एका २२ वर्षीय तरुणानं आपल्या सावत्र आईसोबत पळून जाऊन लग्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याची सावत्र आई त्याच्या वयाच्या दुप्पट वयाची आहे. त्यानंतर ५५ वर्षीय वडिलांनी पोलिस ठाणे गाठून आपल्या मुलाविरोधात तक्रार केली आहे. उत्तराखंडमधील (Uttarakhand) उधमसिंह नगर जिल्ह्यातील बाजपूर येथे ही घटना घडली आहे.

हेही वाचा: 'उत्कर्षा माझ्याशी लग्न कर!', फ्लेक्स लावून गड्यानं घातली लग्नाची मागणी

एका ५५ वर्षीय व्यक्तीने पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर दुसरं लग्न केलं होतं. पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलं होती. लग्न झाल्यानंतर या दोन्ही मुलांनी घर सोडलं. त्यानंतर वडील आपली दुसरी पत्नी आणि एका लहान मुलीसोबत बाजपूर येथे राहत होते. पण, गेल्या एक वर्षापासून लहान मुलगा घरी येत होता. त्याची सर्वांसोबत जवळीक वाढली होती. गेल्या ११ मे रोजी पत्नीने माहेरी जाते, असं सांगून घर सोडलं. पण, ती घरी परतली नाही. त्यानंतर वडिलांना कळलं की, आपल्या पत्नीने आपल्याच लहान मुलासोबत लग्न केलं असून दोघंही एकत्र राहत आहेत.

पत्नी आणि मुलाच्या लग्नाबाबत समजताच वडिलांनी पोलिस ठाणे गाठले. आपल्या मुलाने आपल्यावर हल्ला केला आहे. तसेच माझी दुसरी पत्नी मुलीसोबत २० हजार रुपये घेऊन घरातून फरार झाली आहे, असे आरोप तक्रारीत केले आहेत. पण, पत्नी आणि मुलगा दोघेही प्रौढ आहेत. त्यांना त्यांचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांनी कुठला कायदा मोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई करू, असं पोलिसांनी सांगितलं.

Web Title: 22 Years Old Man Married With Stepmother In Uttarakhand

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uttarakhand
go to top