esakal | काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

At 2:30 am press conference Congress says 109 Rajasthan MLAs support it

आज (ता. १३) मध्यरात्री अडीच वाजता काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे १०९ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अविनाश पांडे, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हे नेते उपस्थित होते.

काँग्रेसची मध्यरात्री अडीच वाजता पत्रकार परिषद; केला 'हा' मोठा दावा

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : राजस्थानमधील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरुद्ध बंड पुकारल्याचे स्पष्ट झाले असून, ते आता भाजपा नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यानंतर आज (ता. १३) मध्यरात्री अडीच वाजता काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे १०९ आमदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अविनाश पांडे, रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन हे नेते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यावेळी बोलताना अविनाश पांडे यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्या आदेशानुसार ते जयपूर येथे पोहोचले असून एकूण १०९ आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थनार्थ पत्र दिले आहे. तसेच, आणखी काही आमदार हे काँग्रेसच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सकाळी १०:३०च्या दरम्यान काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली असून काँग्रेस आमदारांना व्हीप जारी करण्यात आलेला आजही लागू राहणार आहे. जे कोणी आमदार बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असून त्यांचे काँग्रेस पक्षाचे सदस्यत्वही रद्द करण्यात येऊ शकते असे अविनाश पांडे यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, सचिन पायलट हे त्यांच्यासोबत ३० आमदार असल्याचा दावा करत असून ते ३० आमदारांसह भाजपामध्ये जातील, अशी चर्चा सुरू आहे. तसेच, सचिन पायलट यांनी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांची भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटीत काय चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृतरित्या माहिती मिळू शकली नाही. 

सचिन पायलट यांनी रविवारी दिल्लीत काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांची भेट घेतली खरी, पण त्यानंतर ते अलीकडेच भाजपमध्ये सहभागी झालेल्या ज्योतिरादित्य सिंदिया यांचीही भेट घेतली. ज्योतिरादित्य सिंदिया यांनी सचिन पायलट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर एक ट्वीट केले. मित्राच्या सध्याच्या स्थितीवर दया येते, मुख्यमंत्री गेहलोत सचिन पायलट यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसमध्ये कर्तृत्व आणि क्षमता यांना प्राधान्य दिले जात नाही अशा स्वरुपाचे हे ट्वीट आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात सचिन पायलट एक पर्याय म्हणून भाजपशी चर्चा करत आहेत. भाजपने बाहेरुन पाठिंबा देण्याची तयारी दाखवली तर निवडक आमदारांना सोबत घेऊन स्वतंत्र गट स्थापन करण्याची तयारी सचिन पायलट करत आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर सचिन पायलट मुख्यमंत्री होण्यास उत्सुक आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.