esakal | देशात लॉकडाउन हवाच, टास्क फोर्सची मागणी; केंद्र सरकार निर्णय घेणार?
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउन

देशात लॉकडाउन हवाच, टास्क फोर्सची मागणी; केंद्र सरकार निर्णय घेणार?

sakal_logo
By
नामदेव कुंभार

देशात मागील 24 तासांत साढेतीन लाखांपेक्षा जास्त नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. हे आकडे 50 देशात एका दिवसात मिळालेल्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संक्रमणाचा वेग आटोक्यात आणण्यासाठी देशात कडक लॉकडाउन गरजेचा असल्याचं कोविड टास्क फोर्सनं सांगितलं. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी देशात 15 दिवसांच्या कडक लॉकडाउनची गरज असल्याचं कोविड टास्क फोर्सच्या आधिकाऱ्यानं केंद्र सरकारला सांगितलं आहे. टास्क फोर्सच्या सुचनेनंतर केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागलं आहे. कोविड टास्क फोर्समध्ये एम्स आणि इंडियन काऊंसल ऑफ मेडिकल रिसर्चचा (ICMR) समावेश आहे.

दैनिक भास्करला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यांपासून टास्क फोर्स आणि ICMR देशात कडक लॉकडाउनची मागणी करत आहे. ICMR च्या अंदाजानुसार, कोरोनाच्या दुसरी लाट काही दिवसांत सर्वोत्तम पातळीवर जाऊ जाऊ शकते. अशा परिस्थितीत कोरोना संक्रमण तोडण्यासाठी देशात 15 दिवसाच्या लॉकडाउनची गरज आहे.

केंद्र सरकारनं ICMR आणि एम्सच्या सुचनेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, सुत्रांच्या माहितीप्रमाणे तीन मे नंतर केंद्र सरकार लॉकडाउनबाबात निर्णय घेऊ शकतं. लॉकडाउन अथवा कडक निर्बंधाची घोषणा मोदी सरकारकडून सोमवारी केली जाऊ शकते. सध्या दिल्ली, राजस्थान, हरियाणा, ओडिशामध्ये कडक लॉकडाउन आहे. तर महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये मिनी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये विकेंड लॉकडाउन लावल्यानंतर आलाय. तर मध्य प्रदेशमद्येही सात मे पर्यंत जनता कर्फ्यू आहे.

loading image
go to top