esakal | धक्कादायक ! गेल्या २४ तासात तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

24879 COVID-19 Cases In 24 Hours In India

देशात गेल्या २४ तासांमध्ये २४ हजार ८७९ रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. भारतात आता एकूण एकूण रुग्णसंख्या ७ लाख ६७ हजार २९६ झाली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ७६ हजार ३७६ रुग्ण बरे झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ही संख्या १९ हजार ५४७ होती.

धक्कादायक ! गेल्या २४ तासात तब्बल एवढ्या रुग्णांची वाढ

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांमध्ये २४ हजार ८७९ रुग्णांची वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून रुग्णसंख्या काही केल्या कमी होताना दिसत नाही. भारतात आता एकूण एकूण रुग्णसंख्या ७ लाख ६७ हजार २९६ झाली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ७६ हजार ३७६ रुग्ण बरे झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये ही संख्या १९ हजार ५४७ होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६२.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २ लाख ६९ हजार ७८९ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ६७ हजार ६१ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण १ कोटी ७ लाख ४० हजार ८३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशभरात ११३२ वैद्यकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

दरम्यान एक दिलासादायक बातमी असून सिप्ला इंडिया या भारतीय कंपनीने कोरोनावर सर्वात स्वस्त औषध आणलं आहे. कोरोना रुग्णांवरील उपचारांत वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर औषधाची सिप्रेमी ही जेनेरिक आवृत्ती सिप्ला इंडिया या कंपनीने तयार केली आहे. सिप्ला इंडियाने तयार केलेल्या औषधाच्या १०० मिलिग्रॅमच्या कुपीची किंमत चार हजार रुपये (५३.३४ डॉलर) इतकी ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना आजारावर जगभरात देण्यात येणाऱ्या औषधांमध्ये सिप्रेमी हे सर्वात कमी किमतीचे औषध ठरले आहे. त्याद्वारे सिप्ला इंडियाने आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांवरही मात केली आहे.

सिप्रेमी औषधाची पहिली बॅच १० हजार कुप्यांची आहे. युरोपातील मायलॅन या कंपनीनेही रेमडिसिव्हिर औषधाची जेनेरिक आवृत्ती तयार केली असून, त्यापेक्षा सिप्लाच्या सिप्रेमी औषधाची किंमत ८०० रुपयांनी कमी आहे. हितेरो लॅब्ज लिमिटेड या कंपनीने रेमडिसिव्हिरच्या बनविलेल्या जेनेरिक आवृत्तीची किंमत ५४००, तर मायलॅनने बनविलेल्या जेनेरिक औषधाची किंमत ४,८०० रुपये इतकी आहे.

loading image