राज्यसभेच्या वेळी २५ कोटींची ऑफर

राजस्थानच्या मंत्र्याचा गौप्यस्फोट; पैशापेक्षा जनतेचे प्रेम हवे
25 crore offer during Rajya Sabha Secret blast of Rajasthan minister
25 crore offer during Rajya Sabha Secret blast of Rajasthan minister

जयपूर - राज्यसभेच्या निवडणुकीत एका उमेदवाराला मत देण्यासाठी आपल्याला २५ कोटी रुपयांचा प्रस्ताव आल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे सैनिक कल्याण खात्याचे राज्यमंत्री राजेंद्र गुढा यांनी केला. एवढेच नाही तर राजस्थानात २०२० मध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या काळात ६० कोटींचा प्रस्ताव आला होता, असा दावा त्यांनी केला. कुटुंबाने आपल्याला वेळीच सावरले. पैशापेक्षा जनतेच्या प्रेमाला अधिक महत्त्व द्या, असे सांगितल्यानंतर प्रस्ताव नाकारला, असे गुढा म्हणाले.

झुंझुनू येथील एका खासगी शाळेतील त्यांच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ आज व्हायरल झाला. एका विद्यार्थ्याने गुढा यांना भ्रष्टाचारावर अंकुश कसे ठेवता येईल, असा प्रश्‍न विचारला. त्यावर गुढा म्हणाले, की राज्यसभा निवडणुकीच्या काळात एक व्यक्तीला मत देण्यासाठी मला २५ कोटींचा प्रस्ताव आला होता. याबाबत पत्नीला विचारले असता ती म्हणाली, आपल्याला पैसे नको, जनतेचे प्रेम हवे. आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो की, २०२० मध्ये मला ६० कोटींचा प्रस्ताव आला होता. तेव्हाही मला कुटुंबांनी रोखले. आपल्यासमवेतचे लोक असा विचार करत असतील तर सर्वकाही ठिक होईल, असे गुढा म्हणाले.

दरम्यान, २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत गुढा यांनी बसपच्या तिकीटावर विजय मिळविला होता. त्यानंतर ते २०१९ मध्ये कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. जुलै २०२० मध्ये तत्कालिन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पक्षाच्या १८ आमदारांसह मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात बंडखोरीचा झेंडा फडकाविला होता, तेव्हा गुढा हे गेहलोत यांच्या बाजूने होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये मंत्रिमंडळ विस्तारात गुढा यांना सैनिक कल्याण खात्याचे राज्यमंत्री म्हणून घेण्यात आले.

जून महिन्यात राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान झाले. यावेळी भाजपचे अधिकृत उमेदवार घनश्‍याम तिवारी होते. भाजपने अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिला होता. परंतु चंद्रा यांचा पराभव झाला आणि सत्तारूढ कॉंग्रेसचे तीन आणि भाजपच्या एका उमेदवाराने विजय मिळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com