
केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक; पुज्जापुरा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल २६२ कैद्यांना बाधा
केरळ : देशात कोरोना रुग्णांच्या (corona patients) संख्येत झपाट्याने वाढत होत असतानाच केरळमध्येही कोरोनाने हातपाय पसरले आहेत. दोन दिवसांपूर्वी केरळमध्ये (kerala) एका दिवसात ४६,३८७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. दरम्यान, पुन्हा एकदा केरळ मध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आलेख चढला असून तिरुवनंतपुरमच्या पुज्जापुरा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल २६२ कैद्यांची (262 prisoners corona positive) कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलीय. असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. (262 prisoners test corona positive at Poojappura Central Jail in Kerala)
हेही वाचा: Parosmia : कोरोनामुक्त झाल्यानंतर होणारा हा आजार लहान मुलांसाठी धोकादायक
गेल्या तीन दिवसांत ९३६ कैद्यांची अॅन्टीजन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी २६२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. बाधित झालेल्या कैद्यांची काळजी घेण्यासाठी विशेष वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी कारागृह अधिक्षकाने केलीय. कोरोनाची लागण झालेल्या कैद्यांना वेगळ्या कारागृहात पाठवण्यात आलंय. सविस्तर वृत्त असं की, कन्नुर कारागृहातही १० कैदी कोरोना बाधित झाले आहेत. या कैद्यांना एका एका वेगळ्या कारागृहात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे.
ज्या कैद्यांना कोरोना झाला आहे ते कोझीकोडे आणि कसारागॉड येथील ट्रायल सरु असलेले कैदी आहेत. दरम्यान कारागृहात असणाऱ्या इतर कैद्यांची कोरोना चाचणी करण्यावर अधिक भर देण्यात आला. केरळमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढती असून शुक्रवारी ४१,६६८ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. दरम्यान, तिरुवनंतपुरमने ७८९६ कोरोना बाधित आढळल्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीय.
Web Title: 262 Prisoners Test Corona Positive At Poojappura Central Jail In Kerala Corona Update News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..