esakal | देशातील २७ टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’पासून दूर
sakal

बोलून बातमी शोधा

student-digital

ज्या विद्यार्थ्यांकडे शिकण्यासाठी डिजिटल उपकरणे नाहीत, त्यांना शिक्षक व स्वयंसेवकांच्या मदतीने घरात बसून शिक्षण घेण्याची संधी मिळण्यास सीईआरटी’च्या मार्गदर्शक सूचनांची मदत होईल. 

देशातील २७ टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’पासून दूर

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद असल्याने अनेक शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र हा पर्याय तात्पुरता असून दीर्घकाळासाठी तो योग्य ठरणार नाही. कारण ‘ई लर्निंग’साठी आवश्‍यक असलेले स्मार्टफोन किंवा लॅपटॉपपासून देशातील २७ टक्के विद्यार्थी वंचित आहेत, असे निरीक्षण ‘एनसीईआरटी’च्या अहवालात नोंदविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ऑनलाइन शिक्षणाच्या पाहणीसाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदे (एनसीईआरटी)ने केंद्रीय विद्यालये, नवोदय विद्यालये आणि सीबीएसई संलग्न शाळांमधील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मुख्याध्यापक अशा ३४ हजार जणांशी संपर्क साधला. शैक्षणिक हेतूसाठी स्मार्टफोन, लॅपटॉपसारखी उपकरणांचा प्रभावी वापर करण्याची माहिती नसणे व ऑनलाइन अध्यापन शिक्षकांना सुसंगत नसल्याने दिसून आले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ई लर्निंगसाठी हे विषय कठीण

गणित ः अनेक सूत्र असल्याने एकमेकांमध्ये चर्चा, शिक्षकांकडून प्रोत्साहन व लक्ष देणे हे प्रकार नाहीत. 

विज्ञान ः यात संज्ञा खूप असून प्रयोगशाळेत प्रात्यक्षिकाची गरज असते. 

भाषा ः भाषेचे विषयही शिकणे कठीण असल्याचे मत १७ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.

सामाजिक शास्त्र ः ऑनलाइन शिकवताना विद्यार्थ्यांना याचे आकलन होत नाही.

‘एनसीईआरटी’चे उपाय
शिक्षकांची संख्या वाढविणे आवश्‍यक.
ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल उपकरणे नाहीत त्यांनी राज्य सरकारांनी पुस्तकांचा पूर्ण संच पोचवण्याची व्यवस्था करावी.
ऑनलाइन वर्गाशिवाय विद्यार्थ्यांना कार्यानुभव पुस्तिका, विविध प्रकल्प, कोडी आदींचे साहित्यही पुरवावे
विद्यार्थ्यांच्या जवळपासच शिक्षकांचे घर असेल तर सुरक्षित अंतराचे पालन करून खुल्या जागी वर्ग भरवता येतील. 
असे करणे शक्य नसेल तर समाज मंदिरात दूरचित्रवाणी संच तेथे लावावेत. तेथे विद्यार्थी शैक्षणिक कार्यक्रम पाहू शकतील व ज्ञान मिळवू शकतील.

पाहणीतील ठळक मुद्दे
२७ टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन अथवा लॅपटॉप नाही.
इंटरनेट कनेक्टिव्हीटी व वीज खंडित होण्याची समस्या.
ऑनलाइन शिकवण्यासाठी आणि शिकण्यासाठी अनेकांची मोबाईल फोनला पसंती.
३६ टक्के विद्यार्थी वह्या व पुस्तकांचा वापर करतात.
रेडिओ व दूरचित्रवाणी संचाचा वापर अत्यंत तुरळक.
शिक्षक व विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष संवाद नसणे हा ऑनलाइन शिक्षणातील अडथळा.
विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी बहुतेकांचा प्रत्यक्ष तपासणीवरच भर.
विद्यार्थ्याच्या तंदुरुस्तीसाठी शारीरिक शिक्षणाचे धडे ऑनलाइन देण्याची पालकांची मागणी
कला शिक्षणही आवश्‍यक. 

ऑनलाइन शिक्षण (टक्केवारी)
८४ -  विद्यार्थ्यांचे प्रमाण 
२८ -  शिक्षक व विद्यार्थ्यांना विजेची समस्या
२७ - विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन व लॅपटॉप नाही

ज्या विद्यार्थ्यांकडे शिकण्यासाठी डिजिटल उपकरणे नाहीत, त्यांना शिक्षक व स्वयंसेवकांच्या मदतीने घरात बसून शिक्षण घेण्याची संधी मिळण्यास सीईआरटी’च्या मार्गदर्शक सूचनांची मदत होईल. 
- रमेश पोखरियाल निशंक, केंद्रीय शिक्षण मंत्री

loading image
go to top